Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bank New Rules: 1 नोव्हेंबरपासून बँकिंग नियमांमध्ये मोठा बदल; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 October 2025, 22:58
Bank New Rules: Big change in banking rules from November 1; Will it affect your pocket?

Photo-Sicial Media

देशभरातील लाखो बँक (Bank New Rules) ग्राहकांसाठी महत्त्वाची (Bank News) ठरणारी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. मंत्रालयाने बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा 2025 अंतर्गत नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली असून हे नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून अंमलात येणार आहेत. या नवीन तरतुदींचा थेट परिणाम ग्राहकांच्या बँक खात्यांवर, लॉकर्सवर आणि सुरक्षित कस्टडी मालमत्तेवर होणार आहे.

आतापर्यंत बँक खात्यांमध्ये किंवा लॉकर्समध्ये केवळ एक किंवा दोन नामांकित व्यक्ती ठेवण्याची सुविधा होती. मात्र आता नवीन नियमानुसार ग्राहकांना एकाच वेळी किंवा अनुक्रमे चार नामांकित व्यक्तींची निवड करण्याची परवानगी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहक आता त्यांच्या बँक खात्यासाठी किंवा लॉकरसाठी एकापेक्षा अधिक व्यक्तींना नामांकित करू शकतील. यामुळे भविष्यात जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर दाव्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.

या नव्या नियमांनुसार ग्राहक प्रत्येक नामांकित व्यक्तीला किती टक्के हिस्सा द्यायचा हे स्वतः ठरवू शकतील. उदाहरणार्थ, एका नामांकित व्यक्तीला 50 टक्के, दुसऱ्याला 30 टक्के आणि उर्वरित दोनांना 20 टक्के अशा प्रमाणात हिस्सा वाटता येईल. या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढेल आणि पुढील काळात वादांची शक्यता कमी होईल.

लॉकर्स आणि सुरक्षित कस्टडीसाठीही नवीन नियम लागू होणार आहेत. यानुसार फक्त अनुक्रमिक नामांकनांना परवानगी असेल. म्हणजेच दुसऱ्या नामांकित व्यक्तीला अधिकार पहिल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच लागू होईल. या नियमामुळे मालकी हक्क आणि उत्तराधिकाराची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सुरक्षित होईल.

 

अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे की या बदलांमुळे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढेल आणि दाव्यांच्या निपटाऱ्याची प्रक्रिया एकसंध होईल. ग्राहकांना त्यांच्या ठेवी आणि मौल्यवान वस्तूंवर अधिक नियंत्रण मिळेल. मंत्रालय लवकरच “बँकिंग कंपन्या (नामांकन) नियम 2025” जारी करणार असून त्यामध्ये नामांकन जोडणे, बदलणे किंवा रद्द करण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत स्पष्ट केली जाईल.

या सुधारणा केवळ नामांकनापुरत्या मर्यादित नसून बँकिंग प्रशासन अधिक मजबूत करणे, ठेवीदारांचे संरक्षण वाढवणे आणि अहवाल प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून देशातील बँकिंग व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहक-अनुकूल होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Horoscope Today: Lakshmi's blessings will be on these six zodiac signs on Saturday; Possibility of sudden financial gains, know today's horoscope

Horoscope Today: शनिवारी 'या' सहा राशींवर असणार लक्ष्मीची कृपा; अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp