बदलापूर : बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल (23 सप्टेंबर) पोलिसांसोबत अचानक झालेल्या चकमकीत एन्काऊंटर झाला आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षकांचे संजय शिंदे यांनी अक्षय़चा एन्काऊंटर केला. या प्रकरणात पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर निलेश मोरे जखमी झाले आहेत. संजय शिंदे यांच्या या एका निर्णयामुळे तणावही वाढला आहे. पण राज्यभरातून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे संजय शिंदे नेमके कोण आहेत, असाही प्रश्न केला जात आहेत.
आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत केलं काम…
प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी 1983 मध्ये पोलीस दलात सामील झाल्यानंतर आपल्या करिअरमध्ये १०० हून जास्त गुन्हेगारांचं एन्काऊंटर केलं आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करणाऱ्य अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदेंचा समावेश होता. बदलापूर बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी टीममध्येही त्यांचा समावेश होता.
संजय शिंदे वादाच्या भोवऱ्यात…
संजय शिंदे यांच्या नावावरून वाद सुरू आहेत. पोलीस चौकशीदरम्यान खुनाचा आरोपी विजय पालांडे याला पोलीस कोठडीतून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पालांडे यांच्या गाडीत त्यांचा गणवेशही सापडला होता. या प्रकरणी त्यांचे निलंबनही कऱण्यात आले होते. संजय शिंदे यांचा 2014 मध्ये मुंबई पोलिसांनी पुन्हा समावेश करून घेतला.
इक्बाल कासकरला अटक करण्यात बजावली मोठी भूमिका…
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करण्यात शिंदेची मोठी भूमिका होती. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या पथकाचे संजय शिंदे हे सदस्य होते. त्यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांमध्ये काम केले आहे आणि सध्या बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहे.