औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपल्याच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागात उघडकीस आली आहे. या घटनेने औरंगाबाद जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
समीर मस्के असे आरोपीचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात आरोपी हा आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. यावरूनच काल पुन्हा जोरदार वाद झाले आणि याच रागाच्या भरात पतीने पत्नी आणि मुलगा यांची गळा आवळून हत्या केली.
औरंगाबाद मधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुगणालयात पाठविण्यात आले आहेत. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षाच्या बाळाचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपीने खुद्द पहाटे २ वाजता पोलिसांना आपण खून कलेल्याची माहिती दिली.
दरम्यान, आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. दरम्यान पुढील तपास पोलिस करत आहेत.