पुणे : महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ज्या महिलांचं वय 18 ते 65 वर्षादरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून डिसेंबरचा हफ्ता देखील लवकरच जमा होणार सल्ल्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता. निवडणुकीत या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झालं असल्याचे निवडणूक निकालानंतर दिसून आलं आहे. याच योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांचा प्रतिवाद करण्यात आला होता. तसेच महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून देखील करण्यात आली होती. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे.
दरम्यान आता आचारसंहिता संपली असून लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली होती.
मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे. जर अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर मात्र खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे.