सोलापूर : कामती पोलीस ठाण्यात ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी (ता. ०८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
बबलू नाईकवाडी (वय – ५५ रा. सोलापूर) असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बबलू नाईकवाडी हे कर्तव्यावर हजर होते. यावेळी दुपारी कामती पोलीस ठाण्यात सही करून ते आपले कर्तव्य बजावण्यासाठी कुरूल या गावी गेले असता त्यांना श्वसनाचा खूप त्रास होऊ लागला. दम लागून घाम येऊ लागल्यामुळे ते स्वतः कार चालवत कामती येथे आले.
कामती येथून एका मेडिकल दुकानातून कांही औषधे खरेदी केली. तीऔषधे घेऊन कार ने कामती गावातून जात असताना गाडीतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गाडी मध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच निधन झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी आपल्या सरळ आणि मनमिळावू स्वभावामुळे पोलीस खात्यात सर्व परिचित होते. या घटनेनंतर पोलीस खात्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.