पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. या दौ-यात ते तब्बल 12 सभा घेणार असून पुण्यात देखील त्यांची सभा होणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी पुण्यातील स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. त्यादृष्टीने तयारी केली जात असल्याचे भाजप पदाधिका-यांनी सांगितले आहे.
येत्या 8 नोव्हेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा राज्यभरात सुरू होणार आहे. चार दिवसांत पंतप्रधान मोदींच्या 9 प्रचारसंभांचे नियोजन राज्यभरात करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या सभांचा श्री गणेशा उत्तर महाराष्ट्रातून होणार असून 8 नोव्हेंबर रोजी मोदींची धुळे आणि नाशिकला सभा होईल. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी नांदेड, अकोला, चिमूर, 12 नोव्हेंबरला पुणे, तसेच 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई याठिकाणी सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (दि.29 ऑक्टोबर) रोजी संपली आहे. त्यांमुळे बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरु आहेत. तर, दुस-या बाजूला महायुती व महाविकास आघाडीकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा आणि रोड शोचे नियोजन केले जात आहे.