Amravati News : अमरावती : आई-वडिलांनंतर प्रत्येक मुलाचा पहिला गुरू हा शिक्षक असतो. शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अपार आदर असतो. आजही अनेक शाळांमध्ये शिक्षकाचा आदर्श समोर ठेवून पिढी घडत असते. मात्र, हेच शिक्षक वाह्यात वर्तन करू लागले, तर विद्यार्थ्यांवर संस्कार कसे होणार? असा प्रश्न पडतो. असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद शाळेतील एक गुरुजी वर्गात चक्क टेबलवर झोपून फोनवर बोलत होते. बराच काळ उलटून गेला तरी या शिक्षकांना कोणतंही भान नव्हतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.
अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार
शिक्षक म्हणजे मुलांसाठी आदर्श असतात. मात्र, त्यांनीच हे धक्कादायक कृत्य केले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा परिसरात ही घटना घडली. (Amravati News) येथील जिल्हा परिषद शाळेतील एक गुरुजी चक्क टेबलवर झोपून फोनवर बराच वेळ बोलत होते. या शिक्षकांना फोनवर बोलताना कशाचेही भान नव्हते.
या शिक्षकांचा टेबलवर झोपून पाय पसरुन फोनवर बोलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावातील एकाने व्हिडिओ काढल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
राज्यभरात बहुतांश ठिकाणी शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचे भयाण वास्तव आपण अनुभवत आहोत. (Amravati News) त्यातच स्वतःची जबाबदारी झटकून विद्यार्थ्यांचा विद्यार्जनाचा वेळ फोनवर तासनतास बोलण्यात शिक्षकच खर्ची घालत असतील, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय, असा प्रश्न पालकांकडून देखील विचारला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!