मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उद्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात सभा घेत आहेत. मात्र, अमित शाहा यांचा आजचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. तातडीने ते आता दिल्लीला जाणार आहेत.
आजच्या चार सभांसाठी अमित शाहा शनिवारी काल संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले होते. परंतु काही अपरिहार्य कारणाने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेर अशा सर्व चार सभा रद्द झाल्या आहेत.
मात्र, प्रचारासाठी एक दिवस उरला असताना अमित शहांचा दौरा रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.