वसमत : वसमत येथील युवा कलाकार आमेर खान हा रुपेरी पडद्यावर झळकला आहे. त्याने भूमिका साकारलेला साउथ इंडियन हैदराबाद कॉमेडी फिल्म एफ एम टू डबल मस्ती या नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित शुक्रवारी (ता.६) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
युवा कलाकार आमेर खान यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातून ते साउथ इंडिया हैदराबाद तेलंगणा सिनेसृष्टीचे प्रवास करीत एका वसमत सारख्या छोट्या शहरातून अभिनयास सुरुवात करून जिद्द व चिकाटीने मोठ्या रुपेरी पडद्यापर्यंत च्या प्रवास यशस्वी करून हिंगोली जिल्ह्याचे नाव गाजविले आहे.
आमेर खान याने सुरुवातीला छोटे छोटे अल्बम काढले. त्यानंतर युट्युब वर गाण्याचे अल्बम प्रसिद्ध झाले. टिक टॉक च्या माध्यमातून अनेक टिक टॉक प्रसिद्ध झाले. त्यानंतर आमेर यांनी हैदराबाद गाठले व साउथच्या कॉमेडी मोठ्या पडद्याच्या सिनेमा मध्ये हैदराबाद येथील प्रसिद्ध कॉमेडी एक्टर गुल्लू दादा यांच्यासोबत छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. व नंतर एक मोठ्या दिग्दकार्शाने आमेर चे अभिनय बघून त्याला मोठ्या बॅनरच्या एफ एम टू डबल मस्ती या नावाच्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेसाठी हिरोचे रोल देण्यात आले.
एफ एम टू डबल मस्ती हा सिनेमा पूर्ण होऊन शुक्रवारी (ता.६) जानेवारीला सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी सिनेमागृहामध्ये मध्ये प्रदर्शित झाला आहे. याचेच अवचित्य साधून दिनांक बुधवारी (ता.४) रोजी सायंकाळी ०७ वाजता वसमत येथील कारखाना रोड जवाहर कॉलनी मध्ये एफ एम टू डबल मस्ती फिल्म प्रमोशन चे कार्यक्रम घेण्यात आला होता.
दरम्यान,या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहमान व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शेख हबीब शेख बशीर, सय्यद इमरान अली, तोहीद अफजल, माजी नगरसेवक ऍड शेख मोसिन, माजी नगरसेवक रविकिरण वाघमारे या मान्यवरांच्या हस्ते सिनेमाचे प्रमोशन करण्यात आले.
यावेळी शहरातील सर्व पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व वसमतकरांनी आमेर खान याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.