अजित जगताप
Ambedkar Jayanti 2023 | वडूज : भारत रत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. वडूज ता. खटाव येथील चिमुकल्यांनी अनोखी मिरवणूक काढून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून सर्वांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर साजरी होत आहे. काही कार्यकर्ते हे विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तेवीत ठेवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महापुरुषांच्या विचारांचा पगडा असलेल्या वडून नगरीतील आदिनाथ नगर येथील बाल चिमुकल्यांनी धनाजी बँजो पार्टीचे लहानशी बंद असलेली वाद्य गाडी घेऊन त्यावर गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ठेवून त्याची भव्य मिरवणूक काढली.
कोणत्याही पारंपारिक वाद्य नसतानाही मिळेल त्या साहित्य घेऊन या बाल भीमसैनिकांनी मिरवणूक काढली. भर पावसात ओले चिंब होऊन जय भीमचा जयघोष केला.
या वेळी आदिनाथ नगर वडूज येथील बाल भीम सैनिक समर्थ शेखर खुडे, सार्थक शेखर खुडे, आदित्य प्रकाश खुडे, शिवराज बाळु खुडे, सिद्धेश शेखर खुडे, राज अप्पाजी खुडे, पृथ्वीराज धनाजी दुबळे, आर्यन शंकर वायदंडे, कार्तिक नवनाथ खुडे, हर्षवर्धन धनाजी दुबळे, यश सोमनाथ भिसे, आर्यन सोमनाथ भिसे, निल नवनाथ खुडे, अमेय प्रशांत तुपे यांनी सहभाग घेतला होता.
अलीकडच्या काळात काही कार्यकर्ते वर्गणी गोळा करूनच कार्यक्रम घेत असतात. परंतु, चिमुकल्या या बाल भीमसैनिकांनी विना वर्गणी जयंती साजरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News | वडूज नगरीमध्ये बेरोजगारांच्या मूलभूत गरजासाठी महा रोजगार मेळावा संपन्न