पुणे : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना बोलवलं आहे. या बैठकीकडे धास्तावलेले आमदार जाणार की पाठ फिरविणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे. 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
अजित पवारांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला आतापर्यंत कोण-कोण उपस्थित?
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
अनिल पाटील
आदिती तटकरे
संजय बनसोडे
आनंद परांजपे
रामराजे निंबाळकर