पुणे प्राईम न्यूज डेस्क: पालकत्वाच्या भूमिकेत जाण्याअगोदर गर्भधारणेची तयारी करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडप्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं. कारण निरोगी पालकच निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. निरोगी बाळ जन्मास घालण्यासाठी पालकांनी आपल्या जीवनशैलीत आवश्यक असे बदल करणे गरजेचे आहे. यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी जोडप्याने दैनंदिन जीवनात निरोगी आहाराच्या सवयींचा अवलंब केला पाहिजे. संतुलित आहार तसेच दैनंदिन जीवनातील बदल पुरुष आणि महिला दोघांमधील प्रजननक्षमता अधिक सुधारण्यास सहाय्यभुत ठरतात.
डॉक्टरांच्या मते गर्भधारणेची तयारी करत असताना पालकांनी खालील काळजी घेतली पाहिजे.
1. संतुलित आहाराकडे दुर्लक्ष नको
संप्रेरकांचं (हार्मोनल) संतुलन आणि प्रजनन संबंधित आरोग्य चांगले रहावे यासांची जोडप्याने संतुलित आहार घेण्यास सुरुवात करावी. दैनंदिन जेवणात ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. मसूर, शेंगा आणि प्रथिनांचा आहारात समावेश करा (उदा .मासे, चिकन). ब्राऊन राईस, ओट्स यांचा आहारात समावेश करावा स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते.
2. या काळात कॅफिनचे सेवन कमी करा
कॅफिन जास्त प्रमाणात घेतल्यावर प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. यावर उपाय म्हणजे यासाठी कॅफिनयुक्त पेयांचे सेवन कमी करावे लागेल. कॅफिनच्या सेवनाबद्दल वैयक्तीक डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
3. खूप वजन वाढणार नाही याची काळजी घ्या
पालकांचे जास्त वजन किंवा कमी वजन संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) पातळी वर परिणाम करू शकते. आणि प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
अधिक चालणे, योगा करणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम प्रकार फायद्याचा राहतो. त्यानंतर शरीराला पुरत कॅलरी मिळतील एवढा संतुलित आहार घ्या.
4. व्यसन टाळा
महिला आणि पुरुष दोघांनीही धूम्रपान आणि मद्यपान टाळायाला हवे. नाहीतर यामुळे स्रीबीजाची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. पुरुषांमध्ये या सवयी शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी करू शकतात.
5. तणावाचे व्यवस्थापन करा
खूप जास्त ताण दीर्घकालीन हार्मोन्सच्या पातळीत परिणाम करतो. यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.
योग, ध्यान किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. तणाव व्यवस्थापित करण्यासाठी समुपदेशना सारखा पर्याय निवडलेला चंगला.
गर्भधारणेपुर्वी संतुलित आहारामुळे, आणि वरील बाबींचा संतुलन राखल्यामुळे निरोगी गर्भधारणेस नक्की फायदा होईल.प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यामुळे या बाबतीत मार्गदर्शनासाठी प्रजनन तज्ञांचा सल्ला घेणेकधीही चांगले असते.