जळगाव : येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिथून मेळाव्याच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जळगावामध्ये महायुतीच्यावतीने भव्य मेळावा आज मंगळवारी (ता.13) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही जळगाव विमानतळावर दाखल झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिथून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना त्यांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळली गेली. विमानतळ परिसरातच हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अपघातानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांचा ताफा सभेच्या ठिकाणी रवाना झाला. तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी ताफ्यातील इतर वाहनांमधून सभास्थळी दाखल झाले.