अजित जगताप
Aam Aadmi Party | सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. याचा आनंद आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात पेढे वाटून व्यक्त केला आहे.
आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, रतन पाटील जिल्हा खजिनदार विजयकुमार धोतमल, प्रसिध्दी प्रमुख निवृत्ती शिंदे, जिल्हा सल्लागार अॅड मंगेश महामूलकर, जिल्हा सचिव मारूती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे, शहर उपाध्यक्ष सादिक शेख व पदाधिकाऱ्यांनी पोवई नाक्यावर एकत्र येत आनंद व्यक्त केला. तर यावेळी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.
दिल्ली व पंजाब या राज्यात पक्ष सत्तेत…
आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याच्या आनंद प्रीत्यर्थ बोलताना सागर भोगावकर म्हणाले, आम आदमी पार्टीने जनहिताच्या कारभाराला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दिल्ली व पंजाब या राज्यात पक्ष सत्तेत आहे. महाराष्ट्रातही आम आदमी पार्टी पाळेमुळे मजबूत करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी आपली ताकत दाखवून देईल, असा विश्वास भोगावकर यांनी व्यक्त केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara : महात्मा फुलेंनी विश्वबंधुत्वाची शिकवण दिली : डॉ. फरांदे
Satara News : शिवसेनेच्या लेटर पॅड वर फडणवीस यांची छबी
Satara News | वडूज नगरपंचायतीने वसुली विशेष मोहिमेतून केली दमदार कामगिरी