करमाळा: संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ सह, साखर कारखाना संजीवनी पॅनल चे 21 पैकी सर्व 21 उमेदवार विजयी झाले असून या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चा दारुण पराभव झाला आहे. स्वतः संजयमामा शिंदे यांचा केम ऊस उत्पादक गटातून पराभव झाला आहे. तर विद्यमान आमदार नारायण पाटील भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून विजयी झाले आहेत.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळाच्या जागेसाठी 62 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 8 वा. मतमोजणी सुरु करण्यात आली. सुरुवातीस संस्था प्रतिनिधी गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच ऊस उत्पादक गटातील मतांची मोजणी करण्यात आली त्यानंतर महिला प्रतिनिधी सह सर्व राखीव गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे व सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.
सहकारी संस्था प्रतिनिधी गट :
डॉ. हरीदास केवारे 218 (विजयी)
99 मतांनी विजयी झालेले आहेत.
जेऊर ऊस उत्पादक गटातून श्रीमान चौधरी 8061 (विजयी), महादेव पोरे 8195 (विजयी), दत्तात्रय गव्हाणे 8607 (विजयी).
सालसे ऊस उत्पादक गट ::रविकिरण फुके 8232 (विजयी), दशरथ हजारे 7933 (विजयी) आबासाहेब अंबारे 8479 (विजयी)
पोमलवाडी ऊस उत्पादक गट :
किरण कवडे 8571 (विजयी), नवनाथ झोळ 8343 (विजयी), संतोष पाटील 8328 (विजयी)
केम ऊस उत्पादक गट:
दत्तात्रय देशमुख 8625 (विजयी) विजयसिंह नवले
8106 (विजयी) महेंद्र पाटील 8337 (विजयी).
रावगाव ऊस उत्पादक गट:
डॉ अमोल घाडगे 8575 (विजयी), देवानंद बागल
8092 (विजयी)
अँड राहुल सावंत 8036 (विजयी).
महिला राखीव गट :
राधिका तळेकर 8537 (विजयी), उर्मिला सरडे 8383(विजयी).
इतर मागासवर्गीय गट :
दादासाहेब पाटील 9129 (विजयी).
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट:
राजेंद्र कदम 8806 (विजयी)
विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट :
आमदार नारायण पाटील 9462 (विजयी).
नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलचा दारून पराभव केल्यानंतर आमदार पाटील गटाच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
ऊस उत्पादक सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून कारखाना ताब्यात दिल्याने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देणार.
नारायण पाटील, आमदार करमाळा