मुंबई : आई- वडिल मुलांसाठी काय करतील त्याचा नेम नाही. प्रत्येकालाच आपल्या मुलाची हौस करण्याची इच्छा असते. पण हौशेला मोल नसते, तेच खरे आहे. मुंबईतील वसईतील हौशी आई-बापाने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा नुकताच वाढदिवस साजरा केला आहे. त्याच वाढदिवसाची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.
चिमुकल्याला वेरना कार आवाडते. ती बाब लक्षात आई-बापाने त्याच्या आवडीच्या कारचा हूबेहूब केक बनवत मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला आहे. तब्बल २२१ किलो वजनाचा हा चॉकलेट केक वेरना कारच्या स्वरुपात बनवण्यात आला.
वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला. त्यामुळे त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा विडाच भोईर दाम्पत्याने उचलला होता. रेयांश हा आमच्यासाठी देवाचे गोड गिफ्ट आहे आणि त्यामुळेच त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं करण्याचा संकल्प करत असल्याची प्रतिक्रिया नवीन भोईर यांनी दिली.
मागील वर्षी रेयांशच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी हॅलिकॉप्टरमधून मुंबईहून वसईच्या कामण इथे एन्ट्री घेतली होती. एवढी मोठा केक बनवण्याचे आव्हान मॉन्जिनीज कंपनीने उचलले होते. भिवंडीच्या मॉन्जिनीज केकच्या दुकानात ही ऑर्डर देण्यात आली होती. केकच्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच ऐवढा मोठा केक बनवण्यात आला होता. २२१ किलो वजनाचा केकने सर्वांचे लक्ष वेधले.