बेळगाव: बेळगावमधील तृतीय जिल्हा आणि विशेष पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल ६८ वर्षीय नराधमाला २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला १०,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नंदगडमधील काकर गल्ली येथील रहिवासी निसार अहमद फकरुसाब चापगावी या आरोपीला अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी हि शिक्षा सुनावण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलीच्या पालकांनी नंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली होती.
पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी तपास केला आणि १७ फेब्रुवारी २०२४ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. अंतिम सुनावणी आज न्यायाधीश सी.एम. पुष्पलता यांच्यासमोर झाली, ज्यांनी आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.