Vande Bharat Express : देशभरातून वंदे भारत एक्सप्रेस ही अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच देशभरातून या रेल्वेसाठी मागणी होत आहे. या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदाबाद-मुंबई सेंट्रल दरम्यान 20 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसची शुक्रवारी यशस्वी चाचणी झाली. ताशी 130 किमी वेगाने धावलेल्या या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद-मुंबई हे अंतर अवघ्या 5 तास 21 मिनीटात पार केले. ही चाचणी रिसर्च डिझाईन ॲॅण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सध्याची 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबाद-मुंबई सेंट्रल हे अंतर 5 तास 25 मिनिटे घेते.
देशात पहिल्यांदाच 9 ऑगस्ट रोजी 20 डबे असलेली वंदे भारत एक्सप्रेस धावली. अहमदाबाद येथून शुक्रवारी सकाळी 7 वाजता या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान 20 कोच असलेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन सुरु झाली आहे. अहमदाबाद ते वडोदरा, सुरत असे स्टेशन्स पार करत दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी ही ट्रेन मुंबई सेंट्रलला पोहोचली. अशाप्रकारे या ट्रेनची ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली.
वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात 2019 ला झाली होती. आगामी काळातही केंद्र सरकारने देशभरात विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारतीय रेल्वेने 9 ऑगस्ट रोजी 20 डब्यांसह पहिल्या वंदे भारत ट्रेनची यशस्वी ट्रायल घेण्यात आली.