मुंबई: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने वैयक्तिक कारणांमुळे मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जयस्वालने मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला मुंबई सोडून गोव्यासाठी खेळायचे आहे. एमसीएने त्यांची विनंती मान्य केली. आता जयस्वाल गोव्यासाठी २०२५-२६ हंगामात खेळणार आहे.
एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे आश्चर्यकारक आहे. काहीतरी विचार करून त्याने हे पाऊल उचलले असावे. आम्ही त्याची विनंती मान्य केली. जयस्वालने २३ ते २५ जानेवारीदरम्यान रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध मुंबईकडून शेवटचा सामना खेळला होता. त्याने ४ आणि २६ धावा केल्या; कारण स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईचा जम्मू-काश्मीरकडून ५ बळीने पराभव झाला. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांबा देसाई यांनी सांगितले की, तो आमच्यासाठी खेळू इच्छितो आणि आम्ही त्याचे स्वागत करतो.
पुढच्या मोसमापासून तो आमच्यासाठी खेळेल. जयस्वाल भारतीय संघाकडून खेळत नसताना गोव्याचे कर्णधारपदही भूषवू शकतो. याबाबत देसाई म्हणाले, हो, असे होऊ शकते. तो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतो आणि तो आमचा कर्णधार होऊ शकतो. त्याच्या उपलब्धतेनुसार आम्ही बोलू. अर्जुन अजुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांच्यानंतर मुंबई सोडून गोव्याला जाणारा जयस्वाल हा तिसरा क्रिकेटर आहे. तेंडुलकर आणि लाड २०२२-२३ मध्ये गोव्याला गेले होते. लाङ मात्र गेल्या मोसमात मुंबईला परतला. जयस्वालने जुलै २०२३ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले आणि आतापर्यंत १९ सामन्यांमध्ये ५२ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.