WTC Final 2023 पुणे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.
स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान…!
स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. रहाणेला आयपीएल – २०२३ मधील त्याच्या शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. तब्बल १७ महिन्यांनंतर तो टीम इंडियात परतला आहे. ५ वेगवान गोलंदाज, ३ फिरकीपटू, १ यष्टिरक्षक आणि ६ फलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेने यावेळी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आपल्या आक्रमक वृत्तीमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. रहाणेने रविवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध २९ चेंडूत ७१ धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामुळे चेन्नईने सामना ४९ धावांनी जिंकला. या मोसमातील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले.