प्रा. सागर घरत
करमाळा Wrestling : करमाळा तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी बुधवार (10) सायंकाळी तीन वाजता ऐतिहासिक निकाली कुस्त्यांची (Wrestling) जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. (Wrestling) रेवननाथ ढेरे व युवक, ग्रामस्थ कुस्तीप्रेमी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा मर्दानी खेळ कुस्तीचे (Wrestling) आयोजन ढेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले आहे. (Wrestling)
निकाली कुस्त्यांचे ऐतिहासिक जंगी मैदानचे आयोजन
ग्रामीण भागाच्या तुलनेत करमाळा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील दिग्गज , नामांकित तुफानी मुलांच्या कुस्त्या कुंभारगावच्या मैदानात पाहायला मिळणार आहेत. पहिल्यांदाच कुंभारगाव मध्ये महाराष्ट्र विरुद्ध पंजाब सामना पाहावयास मिळणार आहे
.1) सिकंदर शेख (महान भारत केसरी) विरुद्ध भोला पंजाबी (पंजाब केसरी) 2) विक्रम शेटे (ऑल इंडिया चॅम्पियन) विरुद्ध संतोष जगताप (महाराष्ट्र चॅम्पियन) 3) प्रशांत जगताप (ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध किसन कोकाटे (महाराष्ट्र चॅम्पियन) यांसह अनेक महाराष्ट्रातील नामवंत कुस्त्या कुंभारगाव मैदानात पाहावयास मिळणार आहेत. तरी महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमीनी या मैदानास हजेरी लावण्याचे आवाहन कुंभारगाव युवक व रेवन्नाथ ढेरे मित्रपरिवार यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Wrestling : भोसरी येथे प्रथमच दोन महाराष्ट्र केसरी लढणार..! ९ एप्रिल ला रंगणार कुस्तीचा थरार…!