पॅरिस: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार की नाही, याचा निर्णय पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. CAS आता 11 ऑगस्ट रोजी या प्रकरणी निकाल देणार आहे. स्वत:ला अपात्र ठरवल्यानंतर, विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे (CAS) अपील केले आहे, जिथे सुनावणी पूर्ण झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, आता या प्रकरणावर 11 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो.