(World Cup 2023) पुणे : भारतात खेळल्या जाणार्या एकदिवसीय विश्वचषकाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात (World Cup 2023) होणार आहे. त्याचवेळी या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने एकूण १२ ठिकाणे निश्चित केली आहेत.
क्रिकेटची ही सर्वात मोठी स्पर्धा…!
एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. क्रिकेटची ही सर्वात मोठी स्पर्धा यावर्षी होणार आहे. यापूर्वी २०१९ चा विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये इंग्लंडने जेतेपद मिळवले होते.
विश्वचषकाचे सामने हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई येथे खेळवले जातील. भारत १० वर्षांपासून एकही Icc ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेला अजून ७ महिने बाकी आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Weather News : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!