मेलबर्न: ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोवस्कीसोबतच्या विचित्र योगायोगांची मालिका अखंडीतपणे सुरू आहे. विल पुकोवस्की पुन्हा एकदा जखमी झाला आहे. देशांतर्गत सामन्यादरम्यान विल पुकोवस्कीच्या डोक्याला दुखापत झाली, त्यानंतर खेळाडूला रिटायर हर्ट व्हावे लागले. पुकोवस्कीला मैदानावर दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तो चेंडू डोक्याला लागल्याने विक्रमी 11 वेळा मैदानावर जखमी झाला आहे. आता हा आकडा 12 वर पोहोचला आहे.
चेंडू विल पुकोव्स्कीच्या डोक्याला लागला…
व्हिक्टोरियन फलंदाज विल पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला. त्यानंतर तो मैदानावरच खाली बसला. त्यानंतर दुखापतग्रस्त होऊन त्याला मैदान सोडावे लागले. मात्र, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अपडेटमध्ये म्हटले आहे. सध्या मेडिकल अहवालाची प्रतीक्षा आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियाकडून खेळणारा विल पुकोवस्की याने ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.
विल पुकोव्स्की मैदानावर विक्रमी 12 वेळा जखमी
12 वेळा मैदानावर दुखापत झालेल्या विल पुकोव्स्कीने 2022 मध्ये मानसिक आरोग्याचे कारण देत क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तो जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात विल पुकोव्स्कीने भारताविरुद्ध 62 धावांची संस्मरणीय खेळी खेळली, पण त्या सामन्यातही विल पुकोव्स्कीच्या खांद्याला दुखापत झाली. एक काळ असा होता, जेव्हा विल पुकोव्स्कीची ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम युवा फलंदाजांमध्ये गणना केली जात होती. परंतु, हा खेळाडू त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत दुखापतींशी सतत संघर्ष करत होता. त्यामुळे आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही.
View this post on Instagram