Wi vs Ind 1st Test : पुणे भारतीय क्रिकेट संघाने WTCच्या तिसऱ्या सत्रात धमाकेदार सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिला कसोटी सामना भारताने फक्त ३ दिवसात जिंकला. सलग दोन वेळा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचून उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारताने पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.(Wi vs Ind 1st Test)
WTCच्या तिसऱ्या सत्रात धमाकेदार सुरुवात केली आहे.
पदार्पणाच्या कसोटीत १५० हून अधिक धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १५० तर दुसऱ्या डावात १३० धावा करता आल्या. भारताने पहिल्या डावात ५ बाद ४२१ धावा केल्या होत्या.(Wi vs Ind 1st Test)
वेस्ट इंडिज दौऱ्यापासून भारताच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ सत्राला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात न्यूझीलंडने तर दुसऱ्या वेळी ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले होते.(Wi vs Ind 1st Test) दोन्ही वेळा भारत अंतिम फेरीत पोहोचून पराभूत झाला होता. आता टीम इंडियाने या सत्रातील पहिले मॅच जिंकून WTCचे विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला धक्का दिला आहे. भारताने WTCच्या गुणतक्त्यात सर्वांना मागे टाकात अव्वल स्थान मिळवले आहे.(Wi vs Ind 1st Test)
दरम्यान, या सत्रात आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारत या देशांनी कसोटी खेळली आहे. ऑस्ट्रेलियाचा ३ पैकी २ विजय आणि १ मध्ये पराभव झाला आहे. तर इंग्लंडचा ३ पैकी १ विजय आणि २ मध्ये पराभव झाला आहे. वेस्ट इंडिजने खेळलेल्या एका कसोटीत त्यांचा पराभव झाला. WTCमध्ये एका कसोटीत विजय मिळवल्यास १२ गुण, टाय झाल्यास ६, ड्रॉ झाल्यास ४ आणि पराभव झाल्यास गुण दिले जात नाहीत. टक्केवारीचा विचार केल्यास विजयासाठी १०० टक्के, टायसाठी ५० टक्के, ड्रॉसाठी ३३.३३ टक्के मिळतात. गुणतक्त्यात संघांना टक्केवारीच्या आधारे स्थान मिळते.(Wi vs Ind 1st Test)