पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावरती होत आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
२२ जुलै रोजी याच ठिकाणी झालेला पहिला सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे. आजचा सामना जिंकून भारत विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक असेल. तर, यजमान संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
आजचा सामना जिंकून भारताला विंडीजविरूद्धची सलग 12 वी मालिका जिंकण्याची संधी आहे. जर भारताने मालिका जिंकली तर एका संघाविरूद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर होईल. भारताने यापूर्वी विंडीज विरूद्ध सलग 11 मालिका जिंकल्या आहेत.
दोन्ही संघांमध्ये एक-एक बदल
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, आवेश खान.
वेस्ट इंडीजचा संघ : शाय होप (यष्टीरक्षक), ब्रँडन किंग, शामरह ब्रूक्स, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स, हेडन वॉल्श.