पुणे : आशिया चषक स्पर्धा आता काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने आपण कोठे पाहाल याची महिती पुढीलप्रमाणे
भारताचा आशिया चषकातील पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना रविवारी २८ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताचा दुसरा सामना हा ३१ ऑगस्टला हाँगकाँगच्या संघाबरोबर होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला सुपर – ४ मध्ये प्रवेश करता येऊ शकतो. त्यामुळे हा सामना जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी असेल. हा सामनाही दुबईच्या स्टेडिममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यात सुपर – ४ ही नवीन फेरी खेळवण्यात येणार आहे.
आशिया चषकातील सर्व लाइव्ह सामने कोणत्या चॅनेलवर पाहायला मिळतील, याची माहिती आता समोर आली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर डिस्नी हॉटस्टारवरही तुम्ही हे सामने पाहू शकता.
या सामन्यात सुपर – ४ ही नवीन फेरी खेळवण्यात येणार आहे. या फेरीतील अव्वल दोन संघ हे अंतिम फेरीत पोहोचतील. आशिया चषकाच्या अंतिम फेरीचा सामना हा ११ सप्टेंबरला खेळवण्या येणार आहे. हा सामना दुबईच्या स्टेडियममध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार तो संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून पाहायला मिळू शकतो.