Wagholi News : पुणे, ता.२१ : वाघोली (ता. हवेली) येथील रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा संघ, “ब्लू बाइट्स” ने शिक्षण मंत्रालय (MOE) आणि गृह मंत्रालय (MHA) यांनी . एएमसी अभियांत्रिकी महाविद्यालय, बेंगळुरू, कर्नाटक येथे आयोजित केलेल्या कवच-2023 सायबर सिक्युरिटी हॅकाथॉन जिंकत प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले. (Wagholi News)
१ लाखांचे पारितोषिक प्रदान
तीन दिवस सुरू असलेल्या या हॅकाथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल, टीम “ब्लू बाइट्स” ला आयोजकांकडून १ लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. (Wagholi News)
टीममध्ये टीम लीडर म्हणून कंप्युटर सायंन्सच्या तृतीय वर्षात शिकत असलेला शुभम पांडे, अभिषेक वाघमारे, श्रेयस वाल्डेॉ, खुशी पांडे, बी टेक एआयचा वरुण मोरे आणि भानुप्रिया साहू यांचा समावेश होता. सोनाली सोनवणे, सारिका खोपे, रचना साबळे आणि डॉ. एस.के. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक केले. (Wagholi News)
दरम्यान, कवच-२०२३ सायबर सिक्युरिटी हॅकाथॉन हे सायबर सुरक्षा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय शिखर म्हणून ओळखले जाते, जे तरुणांना डिजिटल सुरक्षेच्या जटिल लँडस्केपमध्ये मार्गदर्शन करण्याचे काम करते. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, सायबर धोक्यांना तोंड देण्यासाठी आणि आधुनिक सायबर सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन उपाय विकसित करण्याचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले.
रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर, यांनी उल्लेखनीय कामगीर केलेल्या “ब्लू बाइट्स” टीमच्या विजेत्यांचे अभिनंदन केले व भावी प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या. (Wagholi News)