बंगळुरु: विराट कोहलीने आपल्या T20 कारकिर्दीतील 100 वे अर्धशतक झळकावले आहे. आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात त्याने हा आकडा गाठला. T20 मध्ये 100 अर्धशतके झळकावणारा कोहली हा आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे. T20 मध्ये 100व्यांदा 50 धावांचा टप्पा पार करणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कोहलीने टी-२०मध्ये १२ हजार धावांचा आकडा गाठला होता.
आता कोहलीने T20 मध्ये 100व्यांदा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाबविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात कोहलीने आयपीएलमधील 51 वे अर्धशतक झळकावले. याशिवाय त्याने या स्पर्धेत 7 शतकेही झळकावली आहेत. कोहलीने पंजाबविरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
पंजाबविरुद्ध खेळला जाणारा सामना वगळता कोहलीने आतापर्यंत एकूण 377 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 360 डावांत फलंदाजी करताना त्याने 41.14 च्या सरासरीने आणि 133.36 च्या स्ट्राईक रेटने 12015 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 8 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 122* धावा आहे.