बंगळुरु: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 17 व्या हंगामातील दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) या दोघांमध्ये होत आहे. आरसीबीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 182 धावा केल्या. विराट कोहलीने 83 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली. दोन संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही आणि १७ धावांवर कर्णधार फाफ डू प्लेसिसची (८) विकेट गमावली. यानंतर विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलने ग्रीनच्या विकेट घेत ही भागीदारी संपुष्टात आणली. ग्रीनने 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. ग्रीन बाद झाल्यानंतर काही वेळातच कोहलीने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. यादरम्यान हर्षितने 4 षटकात 39 धावा दिल्या. याशिवाय किफायतशीर असलेल्या रसेलने 4 षटकांत 29 धावा दिल्या. एक यश सुनील नरेनने 4 षटकात 40 धावा देत मिळवले. आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला चांगलाच फटका बसला. स्टार्कने 4 षटकात 47 धावा दिल्या.