मुंबई : काल श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत उमरान मलिकने लंकेचा कर्णधार दसुन शनाका याला जाळ्यात पकडले. उमरान मलिकने या टाकलेल्या चेंडूवर शनाका बाद झाला आणि उमरानच्या नावावर एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. शनाका याला बाद केलेला चेंडू उमरान मलिकने १५५ किमी प्रतितास एवढ्या वेगाने टाकला होता. त्यामुळेच जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत निघाला आहे.
काल श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत हा विक्रम उमरान मलिकने आपल्या नावावर केला. या लढतीत मलिकने ४ षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले. १७ व्या शतकातील चौथा चेंडूवर त्याने लंकेचा कर्णधार दसुन शनाका याला पॉईंटवर उभ्या असलेल्या युझवेंद्र चहलकडे झेल देण्यास भाग पाडले. तेथूनच सामना फिरला.
यापूर्वी हा विक्रम जसप्रीत बुमराह यांच्या नावावर होता. बुमराहने १५३.३६ च्या वेगाने चेंडू फेकला होता. मोहम्मद शमी १५३.३० किमी वेगाने चेंडू टाकून तिसरे तर नवदीप सैनीने १५२.८५ किमी वेगाने चेंडू टाकून चौथे स्थान मिळवले होते. उमरान मलिकने टाकलेल्या या वेगवान चेंडूने त्याला भारताकडून सर्वात वेगवान मारा करणारा गोलंदाज हा किताब मिळवून दिला आहे.