पुणे : बेकायदा ऑनलाईन क्रिकेट बेटींग करणाऱ्या दोन जणांना काल पुण्यातील सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले.त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष शैलेश पारेख (वय 22 रा. सॅलेसबरी पार्क, मार्केटयार्ड,पुणे) आणि आशय अवनिश शहा (वय 28, रा. सुजय गार्डन सोसयटी, स्वारगेट,पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-ट्वेटी क्रिकेट सामन्यावर हे दोघे बेटींग घेत होते. यांच्याकडून 90 हजारांचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये लोटस बेटींगसठी ब्रोकरला व क्लाईंटला बेकायदेशीरपणे लॉगीन आयडी पासवर्ड देण्यात आले होते. ते स्वतःसाठी 12 टक्के कमीशन स्वरूपात मोबादला घेत असल्याचे आढळून आले.
मार्केटयार्ड परिसरातील सॅलेसबरी पार्कमध्ये राहत्या घरी बेकायदेशिर ऑनलाईन क्रिकेट बेटींग सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.पथकाने त्याठिकाणी छापा टाकून हर्ष आणि आशय याला ताब्यात घेतले.
अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, एपीआय आश्विनी पाटील, उपनिरीक्षक श्रीधर खडके, प्रमोद मोहिते, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे, मनिषा पुकाळे यांनी ही कारवाई केली.