लहू चव्हाण
पांचगणी : महाराष्ट्र कबड्डी संघटना व सातारा जिल्हा कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने भाऊसाहेब भिलारे क्रीडांगण येथे व्यायाम मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन १० ते १५ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.
या सहा दिवसीय सरधेत पुरुष व्यवसायिक आणि महिला संघ दोन गटामध्ये २४ संघ, जिल्हास्तरीय १२५ संघ तर हौशी ६५ किलो वजनी गटात ५० संघ सहभागी होणार आहेत.
राज्य पातळीवरील व्यवसायीक पुरुष संघाला ७५ हजार रुपये व चषक, महिला संघाला ४५ हजार रुपये व चषक पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या आणि उपांत्य फेरीतील संघांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
सहा दिवस चालणाऱ्या या कब्बडी स्पर्धेसाठी पाचगणी व्यायाम मंडळाच्या संचालकांनी गेली महिनाभरापासून कंबर कसली असून स्पर्धेचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. क्रीडांगणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यू ट्यूब-लाईव्ह प्रक्षेपण त्याचबरोबर डिजीटल स्कोर बोर्ड व स्क्रीनचा वापर करण्यात येणार आहे. आलेल्या खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.