पुणे : स्थूलत्व व मधुमेहमुक्त विश्व अभियानाचे प्रेरणास्थान डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध 35 ठिकाणी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती असोसिएशन फॉर डायबेटीस अॅन्ड ओबेसिटी रिव्हर्सलच्या (अडोर ट्रस्ट) विश्वस्त डॉ. वेदा नलावडे यांनी दिली.
पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध 35 ठिकाणी वॉकेथॉन होणार आहे. रविवारी (दि.10) सकाळी 6 ते 9 या वेळेत जगभरातील विविध 250 ठिकाणी 5 किलोमीटर चालण्याचा विश्वविक्रम होणार आहे. या उपक्रमात हजारो लोक सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवण्याचा उद्देश आहे, असे अभियानाचे समन्वयक डॉ. संतोष ढुमणे, प्रा. दीपक येवले व प्रीतम वाघमैतर यांनी सांगितले.
दरम्यान, ज्यांना या पाच किलोमीटर चालण्याच्या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी विवेक कुलकर्णी यांना 9420154742 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन विश्वस्त डॉ. वेदा नलावडे यांनी केले आहे.