लोणी काळभोर, (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ उत्सव रविवारी (ता. २६) सुरु होत आहे. त्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने राज्यातील नामांकित पहिलवानांचा मातीवरील कुस्त्यांचा निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा बुधवारी (ता. ०१) दुपारी रंगणार आहे.
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील गावचे ग्रामदैवत कालभैरवनाथ उत्सवानिमित्त बुधवारी (ता. ०१) कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान माउली जमदाडे व पैलवान बाला रफिक शेख यांच्यात लढत होणार आहे. मानाची गदा, २ लाख ११ हजार रुपयांची इनामी कुस्ती होणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती हि पैलवान रोहित जवळकर व पैलवान विकास पाटील यांच्यात होणार आहे. मानाची गदा, १ लाख ५१ हजार रुपये हि कुस्ती होणार आहे. तर पैलवान अक्षय गरुड व पैलवान अनिल ब्राम्हणे यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.
१ लाख ११ व मानाची गदा इनामी कुस्ती होणार आहे. २९ निकाली कुस्त्या होणार आहेत. कुंजीरवाडी ग्रामस्थांच्या वतीने पहिल्या तीन निकाली कुस्तीस मानाची गदा किताब देण्यात येणार आहे. तसेच नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या चितपट निकाली होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रविवारी (ता. २६) पिरसाहेब संदल सायंकाळी ६ वाजता, सोमवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्री काळभैरवनाथ अभिषेक व मिरवणूक, तसेच संध्याकाळी “लावण्य चंद्रा” ऑक्रेस्टा, मंगळवारी (ता. २८) चाबिबा व ढोल लेझीम रात्री नऊ वाजता, बुधवारी (ता. ०१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास व संध्याकाळी नऊ वाजता “अहिरेकर लोकनाट्य तमाशा”चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भव्य अशा नामांकित मल्लांच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे.