मुंबई: तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर अनेक उत्कृष्ट कॅच पाहिले असतील. पण एक कॅच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कॅच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील आहे. हा कॅच पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वोत्तम कॅच असल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा झेल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
या व्हिडिओमध्ये फलंदाज समोरून शॉट मारतो. पण ३० यार्ड सर्कलजवळ उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे वेगाने धावत असतो. हा क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ जवळ धावत गेला आणि झेल घेतला. या झेलची खास गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षक मागे लांबून पळत होता. यानंतर तो सीमारेषेला स्पर्श करणार तेवढ्यात चेंडू जवळच उभा असलेला क्षेत्ररक्षकाकडे फेकतो आणि तो सहज झेल घेतो.
THAT’S AN ILLEGAL CATCH…!!! ????pic.twitter.com/bWNWCzrJ2s
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 13, 2024
फील्डरने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेल…
या आश्चर्यकारक झेलनंतर फलंदाजासह चाहत्यांना धक्काच बसला. काही चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण खूप अवघड वाटणारा झेल क्षेत्ररक्षकाने आधीच घेतला होता. अशाप्रकारे फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पण क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने मागे धावत झेल पकडला, त्यावर फलंदाजासह चाहत्यांना विश्वास बसणे सोपे नव्हते. सोशल मीडियावरील चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आजपर्यंत असा झेल पाहिला नाही. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात आश्चर्यकारक झेल आहे.
WHAT A CATCH…..!!!!! ????????
– One of the greatest fielding efforts in cricket history. [Rob Moody]pic.twitter.com/1ScwmXBz5P
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024