IND-W vs IRE-W : स्मृती मंधाना धमाकेदार फलंदाजीचा नजारा पेश केला आहे. या दरम्यान तिची बॅट चांगलीच तळपताना दिसून आली. भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकका खेळवली जात आहे. या मालिकेत स्मृती मंधानाची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता तिने आयर्लंडविरुद्ध खेळताना सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत तिने अवघ्या ७० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह ती भारतीय संघासाठी सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे. तिने हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौरने ८७ चेंडूंचा सामना करत शतक ठोकळ होतं.
या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजीला येताच, स्मृती मंधानाने आयर्लंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. तिने ताबडतोड फलंदाजी करत प्रतिका रावलसोबत मिळून पावरप्लेमध्ये ९० धावा चोपल्या. या दोघींनी मिळून अवघ्या ७७ चेंडूत शतकी भागीदारी केली.
स्मृती ने ३९ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढील केवळ ३१ चेंडूत आणखी ५० धावा जोडत तिने आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीदरम्यान तिने ४ षटकार आणि ९ चौकार लागावले.
स्मृती ती मंधानाच्या नावे मोठा विक्रम..
स्मृती ती मंधानाने या शतकी खेळीसह आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. ती वनडे क्रिकेटशमध्ये १० शतकं झळकावणारी पहिलीच डावखुऱ्या हाताची फलंदाज ठरली आहे. यापूर्वी देखील काही फळंदाज आहेत ज्यांनी १० शतकं झळकावली आहेत. मात्र ते उजव्या हाताचे फलंदाज आहेत.
स्मृती ती मंधाना सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिची गेल्या १० वनडे सामन्यातील कामगिरी पाहिली, तर तिने ६ अर्धशतकं आणि २ शतकं झळकावली आहेत. या डावात फलंदाजी करताना तिने ८० चेंडूत १३५ धावा चोपल्या. तिच्याकडे दुहेरी शतक झळकावण्याची संधी होती. मात्र ती बाद होऊन माघारी परतली.