मेलबर्न : उपांत्य फेरीपूर्वी सराव करताना झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड भारताविरुद्धच्या लढतीत खेळू शकला नाही. मात्र, रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीसाठी मार्क वूड तंदुरुस्त झाला असल्याने अंतिम संघात त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.
रविवारी इंग्लंड व पाकिस्तान यांच्या दरम्यान टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम लढत होणार आहे. या लढतीत मार्क वूडचा सहभाग जवळपास निश्चित मानला जात आहे. यामुळे पाकिस्तानी फलंदाज व मार्क वूड यांच्यातील वर्चस्वाची लढाई होणार असल्याने या लढतीत आतापासूनच चुरस दिसणार आहे.
उपांत्य फेरीपूर्वी इंग्लंडचा संघ सराव करत असताना मार्क वूड जायबंदी झाला होता. या गंबीर दुखापतीमुळे त्याने तात्काळ सराव सोडून तो उपचारासाठी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यावेळी त्याची दुखापत गंबीर स्वरूपाची असल्याने त्याला भारताविरुद्धच्या लढतीत खेळविण्यात आले नव्हते. उपांत्य लढतीपूर्वी मार्क वूडने ५ लढतीमध्ये तब्बल ९ बळी घेतल्याने इग्लंडसाठी तो महत्वाचा खेळाडू होता.
अंतिम लढतीपूर्वी फिट झालेल्या मार्क वूडने कसून सराव केला असून अंतिम लढतीत त्याला संघात स्थान मिळाल्यास पाकिस्तानी संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.