Asia Cup नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित आशिया चषक सामना श्रीलंकेतच होणार असल्याची माहिती आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी याला दुजोरा दिला. धुमाळ सध्या आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी डर्बनमध्ये आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ यांच्यात आशिया चषकाचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बैठक झाल्याची त्यांनी पुष्टी केली. (Asia Cup)
धुमाळ यांनी सांगितले की, जय शाह यांनी पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांची भेट घेतली आणि आशिया कपचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. आधी जे बोलले जात होते त्याच्याशी हे सुसंगत आहे. पाकिस्तानमध्ये साखळी टप्प्यातील चार सामने आणि त्यानंतर नऊ सामने श्रीलंकेतच होईल.
पाकिस्तानकडून जर खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे धुमाळ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये साखळी टप्यातील चार सामने आणि त्यानंतर श्रीलंकेत नऊ सामने होतील. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा समावेश आहे. दोन्ही संघ अंतिम सामना खेळले तर तेही श्रीलंकेतच होईल असे ते म्हणाले.