ग्वाल्हेर : पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. हार्दिक पंड्याची नाबाद विस्फोटक खेळी आणि संजू सॅमसन, कर्णधारसूर्यकुमार या दोघांच्या प्रत्येकी 29 धावांच्या मदतीने भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश विरूद्धच्या टी-20 मालिकेत विजयी सुरुवात केली आहे.
ग्वाल्हेरमधील न्यू माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियममध्ये बांगलादेशने पहिल्या टी-2OI सामन्यात भारतासमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान भारताने सहज पूर्ण करत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.