पुणे : टी-20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर सामना खेळल्या जाणार आहे. गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
आयसीसी टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा मुकाबला भारत- पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाचा पहिला सामना होणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारतीय वेळेनुसार दीड वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. आता या सामन्यात कोणाचा जोर बघायला मिळणार याची वाट पाहावी लागणार आहे, मात्र पाऊस खलनायक ठरत नाही आणि स्पर्धा रंगली तर थरार आपली मर्यादा ओलांडताना दिसणार हे निश्चित आहे.
भारतीय संघ मागील विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झालेला आहे. मेलबर्नमध्ये शनिवारी सकाळी जोरदार पाऊस झाला आणि आकाश ढगाळ राहिले. महामुकाबलेच्या दिवशी रविवारीही मुसळधार पाऊस पडू शकतो, असे वाटत होते. पण मेलबर्नच्या हवामानात अचानक बदल झाला आणि इथलं हवामान अचानक बदललं. आता मेलबर्नमध्ये पाऊस थांबला आहे, तर इकडे ऊनही निघाले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा मोठा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. यादरम्यान, दोन्ही देशांचे चाहते आपापल्या खेळाडूंना जल्लोष करताना दिसतील.