उरुळी कांचन, (पुणे) : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गायत्री राजेंद्र जगताप या विद्यार्थिनीने “थाळीफेक” तर अनुष्का शंकर वायकर या विद्यार्थिनीने “भालाफेक” या क्रीडा प्रकारात तालुका स्तरावर यश मिळविले आहे. बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी वरील दोघींचीही निवड झाल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती भोसले यांनी दिली.
फुलगाव व धायरी या तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत अनुष समीर मांजरे या विद्यार्थ्याचा ४०० मीटर धावणे स्पर्धेत तिसरा क्रमांक, सृष्टी रोहिदास म्हेत्रे हिचा कराटे या स्पर्धेत तिसरा क्रमांक तसेच व्हालीबाल या सांघिक खेळत मुलांच्या गटात तिसरा कार्मांक मिळवला आहे.
या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे व सांघिक खेळाडू यांना शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भोसले क्रीडा शिक्षक त्रिंबक भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष, विश्वस्त, सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच संस्थेच्या सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.