मुंबई : श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज गानुष्का गुणथिलका याला सिडनी पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि क्रीडा जगतात एकाच खळबळ माजली. गेल्या शनिवारी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या झालेल्या लढतीनंतर सिडनी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
सिडनी पोलिसांनी अटक केल्यानंतर गानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलिया येथेच सोडून श्रीलंका संघ मायदेशी परतला. त्यानंतर श्रीलंका संघ व्यवस्थापनाने गानुष्का गुणथिलका यांच्यावर कारवाईला सुरुवात केली. श्रीलंका बोर्ड
श्रीलंका कार्य समितीने गानुष्का गुणथिलकाची सर्वच प्रकारच्या हकालपट्टी करण्यात आली असून आगामी कोणत्याही स्पर्धेसाठी त्याचा विचार केला जाणार नसल्याचे श्रीलंका कार्य समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्ड देखील कथित गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पाऊले उचलण्यात येणार असल्याचे श्रीलंका बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे. श्रीलंका बोर्ड ऑस्टेलिया पोलिसांना सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे आश्वास श्रीलंका बोर्डाकडून देण्यात आले आहे.