हैदराबाद: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 31 धावांनी विजय मिळवला. आयपीएल 2024 मधील मुंबईचा हा पहिलाच विजय आहे ज्यामध्ये अनेक विक्रम केले गेले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकांत 246धावांपर्यंतच मजल मारू शकला. तिलक वर्माने मुंबईसाठी बराच वेळ प्रयत्न केला आणि 64 धावांची शानदार खेळीही खेळली, पण संघाला विजय मिळवता आला नाही.
तत्पूर्वी राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने इतिहास रचला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने दमदार कामगिरी केली आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली. हैदराबादने आरसीबीचा 11 वर्ष जुना विक्रम मोडला. हैदराबादने मुंबईविरुद्ध 20 षटकांत तीन गडी गमावून 277 धावा केल्या आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर 278 धावांचे लक्ष्य ठेवले.
सलामीला फलंदाजीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने दमदार कामगिरी केली. त्याने मयंक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. अग्रवाल 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्या विकेटसाठी हेडसोबत 68 धावांची भागीदारी केली. 24 चेंडूंचा सामना करताना हेडने नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. त्याने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी अभिषेक शर्माने 273.91 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि सात षटकार ठोकले. त्याने हैदराबादच्या गोलंदाजांना लक्ष्य करत 63 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीविरुद्धच्या या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी चांगलीच क्लास दाखवली. हेनरिक क्लासेन आणि एडन मार्कराम यांच्यात 116 धावांची नाबाद भागीदारी करून संघाला 277 धावांपर्यंत नेले. मार्करामने 28 चेंडूंचा सामना करत 42 धावा केल्या तर हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत 235.29 च्या स्ट्राइक रेटने 80 धावा केल्या. या दमदार खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि सात षटकार आले. मुंबईकडून हार्दिक पांड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.