पॅरिस: महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिने चमकदार कामगिरी करत जियान झेंगवर 4-2 असा विजय मिळवून पॅरिस ऑलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 51 मिनिटे रंगलेल्या सामन्यात अकुलाने 9-11, 12-10, 11-4, 11-5, 10-12, 12-10 असा विजय मिळवला. यासह अकुला ऑलिम्पिकमध्ये अंतिम-16 फेरी गाठणारी दुसरी महिला टेबल टेनिस एकेरी खेळाडू ठरली आहे. अकुलापूर्वी मनिका बत्रानेही हा पराक्रम केला होता.