Sports News : पुणे : आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर आज रविवारी (ता. १७) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. एकीकडे श्रीलंका आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे भारताला विश्वचषकापूर्वी मोठी स्पर्धा जिंकून सकारात्मकता मिळवायची आहे.
अटीतटीच्या सामन्यात जिंकणार कोण?
हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंसाठी हा सामना खूप खास असणार आहे. (Sports News ) हे दोन खेळाडू म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा. या दोघांच्या बाबतीत तब्बल १३ वर्षांनंतर एक खास योगयोग जुळून येणार आहे.
दरम्यान, विराट कोहली वन डे फॉरमॅटमधील शेवटची आशिया कप फायनल २०१० मध्ये खेळला होता. त्यावेळी रोहित शर्मादेखील संघाचा भाग होता. आता तब्बल १३ वर्षांनंतर रोहित आणि विराट एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आशिया कपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहेत. (Sports News ) या दोघांमध्ये कोण उत्तम खेळणार, आणि कोण विक्रम करणार, हे पाहण्याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.
श्रीलंकेचा संघ –
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पथुम निसांका, कुसल परेरा, सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, ड्युनिथ वेलेझ, प्रमोद मदुशन, मथिशा पाथीराना, सहान अरचेगे, दुशान हेमंथा, कासुन रजिता बिनुरा फर्नांडो, दिमुथ करुणारत्ने.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” स्पर्धा; आगीच्या घटना टाळणार
Pune News : सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय सुनेची विषारी औषध पिऊन आत्महत्या..