Sports News : नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्लूटीसी) स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे निराश झालेल्या सुनील गावसकरांनी थेट कर्णधार रोहित शर्मावर आपले शाब्दिक बाण सोडले. रोहितकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने अपेक्षाभंगच केला आहे. तो नेतृत्वाच्या कसोटीवर अपयशी ठरला आहे. आयपीएलचा इतका प्रभावी आणि जबरदस्त अनुभव असतानाही हा दिग्गज कर्णधार म्हणून प्रभावहीनच ठरल्याची टीका त्यांनी केली.
एका कार्यक्रमात ते म्हणाले, मी रोहितकडून अधिक अपेक्षा केली होती. मायभूमीत तो चमकला हे ठीक आहे, पण परदेशातील खेळपट्ट्यांवर त्याची खरी कसोटी होती. (Sports News) तिथे तो अपयशी ठरला. 100 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व आणि आयपीएलचे पाच-पाच वेळा जेतेपद पटकावणारा हिटमॅन आपल्या नेतृत्वात संघाला एकदाही टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचवू शकलेला नाही. ही बाब फारच निराशाजनक असल्याचे गावसकर म्हणाले.
विदेशी मैदानावर कामगिरी ढेपाळली
डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जाब विचारायला हवा. तुम्ही नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतला? (Sports News) नाणेफेकीच्या वेळी सांगितले होते की, ढगाळ वातावरण होते म्हणून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, पहा कोणाला मिळाली संधी…
Sports News : एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीने रचला इतिहास