Sports News : नवी दिल्ली : क्रिकेटसह नऊ खेळांच्या ऑलिम्पिकमधील समावेशाचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता 9 खेळांपैकी कोणत्या खेळांना 2028 मध्ये लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
लॉस एंजिलिस आयोजक व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्यामध्ये या आठवड्यात बैठक होणे अपेक्षित होते. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून ही बैठक पुढे ढकलण्यात आली. (Sports Newsतसेच आयोजक व समिती यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचेही समोर आले आहे. महत्त्वाची बैठक पुढे ढकलण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून नियुक्त करण्यात आलेल्या पॅनेलला क्रीडा प्रोगाममधील बदल व खेळांबाबत माहिती गोळा करून कोणत्या खेळांचा समावेश करायचा याबाबत शिफारसही करण्यात आलेली नाही.
लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होण्यासाठी नऊ खेळ शर्यतीत आहेत. यामध्ये क्रिकेटसह बेसबॉल सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅकरोस, ब्रेकिंग, कराटे, किकबॉक्सिंग, स्क्वॉश व मोटारस्पोर्टस् या खेळांचा समावेश आहे.
बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगच्या भवितव्याबाबत चिंता
बॉक्सिंग, मॉडर्न पेंटॅथलॉन व वेटलिफ्टिंग या तीन खेळांच्या ऑलिम्पिक भवितव्याबाबतही चिंता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 2024 मधील (Sports News) पॅरिस ऑलिम्पिकनंतर या खेळांचा समावेश कायम ठेवायचा का, याबाबत विचार करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : ‘मला त्याबद्दल खेद नाही’; बांगलादेशविरुद्धच्या रागावर हरमनचे स्पष्टीकरण
Sports News : बेसबॉल कर्णधार रेश्मा पुणेकरचा अग्निपंख फाउंडेशनतर्फे यथोचित सन्मान