Sports News : पुणे : क्रिकेट विश्वचषकातील काही सामने पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहेत. सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. या सेवेला क्रिकेट शौकिनांचा प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार जादा गाड्या सोडण्याचे नियोजनही वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. सामन्याच्या दिवशी मनपा भवन, कात्रज बायपास आणि निगडी टिळक चौकातून या बसेस सोडल्या जातील.
मनपा भवन, कात्रज बायपास आणि निगडी टिळक चौकातून बसेस सुटणार
पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील पाच सामने खेळवले जाणार आहेत. सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ज्यादिवशी गहुंजे येथे मॅच असेल तेव्हा पीएमपी येण्या-जाण्याच्या सोयीसाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध केली जाईल. यातील पहिली लढत येत्या १९ ऑक्टोबर रोजी आहे. (Sports News) या बससाठी प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकावरून जादा बसेस सोडल्या जातील. मनपा व निगडी बायपास येथून प्रतिव्यक्ती १०० रुपयांचे तिकीट असेल. क्रिकेट सामना संपल्यानंतर परतीसाठी बस असेल.
१९, ३० ऑक्टोबर, १ आणि ८ नोव्हेंबरला गहुंजे मैदानावर डे-नाईट सामने होणार आहेत. त्या दिवशी पुणे मनपा भवन येथून सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेत बस सुटतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ११ आणि ११.३० वाजता बस सुटेल. तर, निगडी टिळक चौकातून दुपारी १२ आणि १२.३० वाजता बस सुटेल. गहुंजे येथे ११ नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील एकमेव सामना दिवसा होणार आहे. (Sports News) या सामन्यासाठी मनपा भवन येथून सकाळी ८.२५, ८.५०, ९.०५ अशा तीन बसेस सोडल्या जातील. कात्रज बायपास येथून सकाळी ८.१५ व ८.३५ वाजता बस सुटेल. निगडी टिळक चौकातून सकाळी ८.३० व ९.०० वाजता बस सुटेल, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. पीएमपीच्या या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : पुणे स्टेडियमवर तब्बल २७ वर्षांनंतर रंगणार वर्ल्डकप सामने
Sports News : गोल्फर अदिती अशोकची रौप्य पदकाला गवसणी
Sports News : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सहा पदके; महिला क्रिकेटसह नेमबाजीत सुवर्णपदक