Sports News : मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, आशिया कपच्या तोंडावर हा मोठा दिलासा मिळाला आहे. आशिया कप 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यर फिट झाला असून, तो आता निवडीसाठी उपलब्ध आहे.
राहुलच्या परतण्याने वनडे संघ समतोल
लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार के. एल. राहुलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि वेस्ट इंडीज दौऱ्याला देखील मुकला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत होता. (Sports News) आता तो आशिया कपसाठी 100 टक्के फिट झाला आहे. के. एल. राहुलने आपल्या इन्स्टाग्रामवर विकेटकिपिंग आणि फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुरूवातीला आलेल्या वृत्तानुसार, के. एल. राहुल आशिया कपपर्यंत फिट होण्याची शक्यता कमी होती. मात्र, एका वृत्तानुसार तो आता पूर्णपणे फिट झाला असून निवडीसाठी उपलब्ध आहे.
के. एल. राहुलच्या संघात परतण्याने वनडे संघाचा समतोल चांगला झाला आहे. तो संघातील प्रथम पसंती असलेला विकेटकिपर आहे. (Sports News) सध्या भारतीय संघात इशान किशनवर विकेटकिपिंगची जबाबदारी आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी दिली होती. मात्र, त्याला अपयश आले. राहुलच्या संघात परतल्याने कर्णधार रोहित शर्माला अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवण्याची संधी मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : 2036 मध्ये भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणार; क्रीडामंत्र्यांनी आखली योजना..
Sports News : विक्रमी खेळी करत रवींद्र जडेजाने कपिल देवसह अनिल कुंबळे यांना टाकले मागे
Sports News : एम्बाप्पेला 2725 कोटींची ऑफर; संघात घेण्यासाठी रिअल माद्रीद, सौदीमध्ये चढाओढ.